पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरची फसवणूक
Pckhabar- पेटीएममधून बोलत असल्याचे खोटे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका डॉक्टरची 50 हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार हिंजवडी येथे नुकताच उघडकीस आला.
याप्रकरणी मिलिंद शरद गावडे (वय-57, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7478868288 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. गावडे यांना 7478868288 या क्रमांकावरून एकाने फोन करून पेटीएममधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. केवायसी अपडेट करण्यास सांगून ते अपडेट झाले नाही. त्यामुळे आरोपी मोबाईल धारकाने गावडे यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपच्या माध्यमातून गावडे यांच्या खात्यातून 50 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. फौजदार इंगोले अधिक तपास करत आहेत.










Leave a Reply