देहूगावात कोरोनाचा धोका वाढतोय ; 11 नवे रूग्ण, एकाचा मृत्यू
Pckhabar- देहूगावात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आज (शनिवार) कोरोनाच्या 11 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देहूत आजपर्यंत 196 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. तर आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 153 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 38 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
शनिवारी कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद झाली असून 14 रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. देहू परिसरात आत्तापर्यंत 196 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 153 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 38 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 21 रूग्णांना लक्षणे नसून 17 रुग्णांना लक्षणे आहेत. 16 रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.










Leave a Reply