लाॅकडाऊनच्या ब्रेकनंतर लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

लाॅकडाऊनच्या ब्रेकनंतर लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
स्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकातून वाहतूकीला प्रारंभ
Pckhabar- : कोरोनामुळे सुमारे पाच महिन्यापासून बंद असलेली एसटीची वाहतूक पुणे जिल्ह्यातंर्गत सुरू झाली आहे. स्वारगेट आणि वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकातून जिल्ह्यातील विविध भागात 15 मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी तालुका ते जिल्हा व जिल्हा ते तालुका अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना ई-पासची आवश्यकता नाही, असे एसटी प्रशासनाकडून शनिवारी सांगण्यात आले.

राज्यात एसटीची सेवा 25 मार्चपासून बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यात टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागात एसटीची सेवा सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरातून एसटीची सेवा बंदच होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी टप्याटप्याने बस सोडल्या जात आहेत. एसटीच्या पुणे विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती, भोर, शिरूर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, जुन्नर, नीरा, आळेफाटा, भिमाशंकर, वेल्हा, दौंड, पाटस, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, पाबळ, घोडेगाव, अवसरी, भिगवण, मुळशी आदी मार्गावर सेवा सुरू होणार आहे.

या गाड्यांसाठी नियमीत तिकीट दर आकारण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क अनिवार्य असणार आहे. तसेच, एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी बसू शकणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *