पिंपरी-चिंचवड शहरात आज 1 हजार 13 नवे रूग्ण, 18 जणांचा मृत्यू

पिंपरी -चिंचवड शहरात आज 1 हजार 13 नवे रूग्ण, 18 जणांचा मृत्यू
518 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे  1 हजार 13 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 28  हजारी ओलांडली आहे. तर 18   जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 518 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 28 हजार 65  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सात हजार 120 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात शनिवारअखेर 19 हजार 312 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 584 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 475 तर 109 मनपा हद्दीबाहेरील आहेत. शनिवारी 1 हजार 966 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 566 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 630 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

सहयोगनगर (पुरुष 55 वर्षे), आकुर्डी(पुरुष 55 वर्षे), भोसरी (पुरुष 72 वर्षे, पुरुष 62 वर्षे), डांगे चौक थेरगाव (स्त्री 63 वर्षे), वाल्हेकरवाडी चिंचवड (पुरुष 67 वर्षे), काळेवाडी (पुरुष 55 वर्षे), चिखली (पुरुष 81 वर्षे), चिंचवड (पुरुष 56 वर्षे, पुरुष 62 वर्षे, पुरुष35 वर्षे), थेरगाव (स्त्री 63 वर्षे), पिंपरी (पुरुष 50 वर्षे, पुरुष 63 वर्षे), स्पाईन रोड भोसरी (पुरुष 35 वर्षे), चाकण (पुरष 50 वर्षे,पुरुष 60 वर्षे), देहुरोड (स्त्री 47 वर्षे) या भागातील 18 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 18 हजार 577 घरांना भेटी देऊन 61 हजार 341 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *