पवना धरण @ 50 टक्के

पवना धरण @ 50 टक्के

Pckhabar- पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा 49.50 टक्के झाला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकर, मावळवासीयांची पाण्याची चिंता कमी झाली आहे. मागील आठ दिवसात धरणातील साठ्यात 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागील नऊ महिन्यांपासून शहरवासीय एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. त्यातच जुन, जुलै संपला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसात धरणातील साठ्यात 17 टक्यांनी वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 49.50 टक्के पाणीसाठा असून धरण अर्धे भरले आहे. तर, 1 जूनपासून आजपर्यंत 772 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. कालपासून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे, असे पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *