Pckhabar- ’रात्री तु कोणाबरोबर बोलत असतेस’, असे विचारणार्या पोलिसालाच त्यांच्या पत्नीने उलथण्याने मारहाण केली. मुलाने हाताने गळा दाबला तर मुलीने जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पोलिसाला पाच टाके पडले आहेत. हा प्रकार शुक्रवारी दुपारी बोपखेल येथे घडला.
याप्रकरणी 55 वर्षीय पोलिसाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 44 वर्षीय पत्नी, 24 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय मुलगी अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबई दलात कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब बोपखेल येथे वास्तव्यास आहे. फिर्यादी सध्या मेडिकल रजेवर असून बोपखेल येथे घरी आले आहेत. फिर्यादी यांनी पत्नीला ’रात्री तु कोणाबरोबर बोलत असतेस’, असे विचारले. यामुळे चिडलेल्या पत्नीने
उलथण्याने मारहाण केली. त्यांच्या मुलाने हाताने गळा दाबला तर मुलीने हाताने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. सहायक पोलीस फौजदार एस. आय. चव्हाण तपास करत आहेत.










Leave a Reply