गणेश मंडळांनी महापालिकेला स्वयंसेवक द्यावेत- आयुक्त हर्डीकर यांचे आवाहन

गणेश मंडळांनी महापालिकेला स्वयंसेवक द्यावेत- आयुक्त हर्डीकर यांचे आवाहन
  Pckhabar- यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन  कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये काम करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिकेच्या मदतीसाठी स्वयंसेवक द्यावेत. त्यांच्या माध्यमातून पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांचा सर्व्हे केला जाईल. लक्षणे असलेल्या रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत देता येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाग्रस्त 80 टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये राहून दहा दिवसानंतर ते घरी जावू शकतात. मात्र, लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळीच शोधून चांगली सेवा द्यायची आहे. त्यासाठी स्वयंसेवकांच्या मदतीची गरज आहे.  श्रावण महिना अर्धा संपत आला आहे. आत्तापर्यंत सर्व सण घरात राहून साजरे केले आहेत. त्यातून जबाबदारीची जाणीव पुढे आली आहे. यापुढेही राखावी. दहीहंडी, गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणे गरजेचे आहे.  आद्यदैवत बाप्पाचे आगमन दरवर्षीच्या उत्साहात यंदा करता येणार नाही. याची जाणीव सर्वांनी ठेवावी. गणेश चतुर्थीदिवशी वाजतगाजत मिरवणूक काढतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक उपक्रम करत असतात. यावर्षी घरात राहून भक्तीभावाने पूजन करायचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध आहेत. घरातील गणपतीचे घरातच विर्सजन करावे. भक्तीला कुठलीही मूरड घालायची नाही. आपल्या भक्तीमुळे उत्साहाच्या वातावरणावर विरजन पडणार नाही. याची दक्षता घ्यायची.

स्वयंप्रेरने बंधने घालावीत. पालिकेने यंदा ऑनलाईन पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. त्याचपद्धतीने शहरातील गणेश मंडळांनी आपले कार्यक्रम, आरती ऑनलाईन पद्धतीने करावी. त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जाणार आहे. कोरोना स्वत:हून पसरत नाही. त्याला आपण पसरवतो. तो पसरायचा थांबला तर तो मरणार आहे. आपल्याला हा प्रसारच रोखायचा आहे. यासाठी काही निर्बंध स्वत:वर घालावेत असे सांगत आयुक्त म्हणाले. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आपल्या आवाहनाला साद देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *