देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल

देहूतील संत जिजाबाई कन्या विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल
99 टक्के गुण मिळवत प्रेरणा उढाण विद्यालयात प्रथम
 Pckhabar- देेेहूगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. प्रेरणा पाराजी उढाण हिने 99 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायली संतोष गाडे हिने 94 टक्के गुण मिळवत द्वितीय तर गौरी मनोहर विधाटे हिने 93.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. 

विद्यालयाच्या 134 विद्यार्थीनींनी दहावीची परीक्षा दिली होती. सर्व  विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.  यामध्ये 12 विद्यार्थीनींनी 90 च्या पुढे टक्केवारी प्राप्त केली असून 73 विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. शाळा स्थापनेपासून प्रथमच उच्चांकी निकाल लागला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थीनींनीचे मुख्याध्यापिका लुटे एस. आर, पर्यवेक्षक तथा अजिव सदस्य आनंदराव तांबे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. राम कांडगे, विभागीय अधिकारी रत्नपारखी के. डी, सहायक विभागीय अधिकारी पवार एस. टी यांनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *