विम्याच्या पैशांवर सुशांतच्या कुटुंबियांचा डोळा; रिया चक्रवर्तीचा सनसनाटी आरोप

विम्याच्या पैशांवर सुशांतच्या कुटुंबियांचा डोळा; रिया चक्रवर्तीचा सनसनाटी आरोप
Pckhabar- अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून शुक्रवारी ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला. या चौकशीत रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून सुशांतच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असे रियानं म्हटलं असल्याची माहिती आहे.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात पाटणा पोलिसांनी रिया चक्रवर्ती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर श्रृती मोदी यांचीही चौकशी करण्यात आली. साडेआठ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. काहीवेळ तिथे गोंधळही निर्माण झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *