खडकी, पुणे, देहुरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लांबणीवर
देशातील 56 कँटोन्मेंट बोर्डांना सहा महिने मुदतवाढ
Pckhabar- खडकी, पुणे आणि देहुरोडसह देशभरातील 56 कँटोन्मेंट बोर्डांना सहा महिने मुदतवाढी संदर्भातील अधिसुचना दिल्ली संरक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकतीच जारी करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे कँन्टोन्मेंट बोर्ड निवडणुका आणखी लांबणीवर पडली गेली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने लष्कराच्या चार ही मुख्यलयांना या संदर्भातील आधिसुचना पाठवली आहे. जानेवारी 2015 मध्ये कँटोन्मेंट निवडणुका पार पडल्या होत्या. त्याचा कार्यकाळ फेब्रुवारी 2020 मध्ये संपुष्टात आला होता. प्रशासकीय कारणामुळे निवडणूका घेणे शक्य नसल्याचे कारण सांगत संरक्षण मंन्त्रालयाच्या वतिने 5 फेब्रुवारी रोजी सर्व 56 कँटोन्मेंट बोर्डास सहा महिन्याची मुदतवाढ दिली होती. या मुदत वाढीचा कार्यकाल दि.10 आँगस्टला संपणार असल्याने संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सर्व कँटोन्मेंट बोर्डाना दुसर्या टप्प्यातील आणखी सहा महिने मुदतवाढीची अधिसुचना पाठविण्यात आली. प्रशासकीय कारणास्तव कँटोन्मेंट निवडणुका घेणे शक्य नसल्याने सदर मुदतवाढ वाढविण्यात आली असल्याचे अधिसुचनेत म्हटले आहे. सदर मुदतवाढ ही 10 फेब्रुवारी 2021 पर्यत असणार आहे.
सध्या देशभरात सर्वत्रच कोरोनाने थैमान घातले आहे. या कालावधीत निवडणुका घेणे अशक्य असल्याने तसेच केंद्र शासनाच्या वतिने कँटोन्मेंट कायद्यात मोठे बदल केले जात असल्याने कँटोन्मेंट बोर्ड निवडणुका पुढे ढकलले जात असल्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांकडुन वर्तवली जात आहे.










Leave a Reply