पिंपरी महापालिकेच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारा- नगरसेविका मंगला कदम यांची मागणी

पिंपरी महापालिकेच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारा- नगरसेविका मंगला कदम यांची मागणी
Pckhabar-  10 वी व 12वीच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना महापालिका बक्षीस म्हणून रक्कम देते. यासाठी करावे लागणारे अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत अशी सूचना नगरसेविका मंगला कदम यांनी  महापालिका आयुक्तांना केली आहे.
कदम यांनी आयुक्तांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, 10 वी व12 वीचे निकाल लागलेले आहेत. मनपाच्या नागरवस्ती विकास योजना विभागांमार्फत शहरातील 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना र.रुपये 10 हजार व 15 हजार दिले जातात. त्यासाठी नागरवस्ती विभागाकडून अर्ज व त्याबरोबर अनुषंगीक कागदपत्रे मागवली जातात. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. रोज सातशे-आठशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.  ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.  असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.  कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी अर्ज आणि कागदपत्रांसाठी धावपळ करुन अर्ज जमा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी  करणार  त्यामुळे कोरोना संसर्ग होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे.
        त्यामुळे , इ. 10 व 12 वीच्या 80 टक्के  किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी, विध्यार्थ्यींनींना बक्षीस रक्कमेचे अर्ज त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे  ऑन लाईन स्वीकारण्याबाबत व त्यासाठी आवश्यक असणारी संगणकीय यंत्रणा तयार करुन सदरचे अर्ज ऑन लाईन स्वीकारण्याबाबत संबंधितांना आदेश निर्गत करण्यात यावेत. तसेच नागरवस्तीच्या इतर योजनांचे अर्जही योजना जाहीर होतील त्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्यात यावी. अशी विनंतीही  कदम यांनी आयुक्तांना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *