प्लाझ्मा दान करणार्‍यांना युवक काँग्रेसतर्फे प्रोत्साहन निधी

प्लाझ्मा दान करणार्‍यांना युवक काँग्रेसतर्फे प्रोत्साहन निधी
Pckhabar-  कोरोना आजारावर उपचारासाठी अंत्यत प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा उपचार पध्दतीद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्या-या जीवनदात्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी एक हजार रूपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.
9 आगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिन यांचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याबाबात अधिक माहिती देताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, अभूतपूर्व अशा कोरोना या भयानक व जीवघेण्या आजाराने आजवर जगभरात लाखो बळी घेतले आहेत. दिवसेंदिवस हा आजार हाहाःकार माजवत आहे. यावर उपाय म्हणून गेल्या 8 महिन्यांपासून अजून तरी निश्चित औषध उपलब्ध झाले नाही. मात्र, सध्या प्लाझ्मा थेरपी ने मोठ्या प्रमाणात उपचारांना यश मिळत आहे व जीवितहाणी टाळण्यास ती अंत्यत प्रभावी ठरत आहे. यासाठी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना आपला प्लाझ्मा दान करून इतर रूग्णांचे प्राण वाचविता येत आहेत. अधिकाधिक रूग्णांचे प्राण वाचले जावेत यासाठी कोरोनामुक्त  झालेल्या रूग्णांना प्रोत्साहन मिळावे यासाठी युवक काँग्रेसतर्फे   प्रत्येक जीवनदात्यास 1 हजार रूपयांचा प्रोत्साहन निधी देणार आहोत. उपाचारांनतर बरे झालेल्या नागरिकांनी इतर नागरिकांसाठी पुढे यावे व प्लाझ्मा दान करावा व प्रोत्साहन निधी साठी 9860177177, 8484083737 या क्रंमाकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे
याबाबत युवक काँग्रेसने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यांना याबाबतचे पत्र दिले देऊन या उपक्रमाची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *