Pckhabar- रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झालेल्या महिला डॉक्टरला थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनकरुन धीर दिला आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या डॉ. आरती उदगीरकर यांच्या प्रकृतीची पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली. पवारसाहेबांच्या फोनमुळे माझे मनोबल वाढले आहे. माझी काळजी करणाऱ्या सर्वांची मी ऋणी आहे.
पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधून वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांसोबत तिच्यावर सुरू असलेल्या उपचाराबद्दल जाणून घेतले. पवार म्हणाले, ‘वायसीएमच्या डॉक्टरांसोबत माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी लागेल. पुरेशा उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे कारण नाही.
‘गेल्या 16 दिवसांपासून मी वायसीएम रुग्णालयात आहे. जराही कल्पना नव्हती की, एवढे ज्येष्ठ नेते फोन करून विचारणा करतील. पवारसाहेबांच्या फोनमुळे माझे मनोबल वाढल्याचे डॉ. आरती यांनी सांगितले.
Post Views: 119










Leave a Reply