पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे 969 नवे रुग्ण, 1 हजार 121 जणांना डिस्चार्ज, 21 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी कोरोनाचे 969 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 27 हजारी ओलांडली आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 1 हजार 121 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 27 हजार 78 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 हजार 744 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात शुक्रवारअखेर 18 हजार 794 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 566 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 460 तर 106 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
शुक्रवारी 2 हजार 484 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 1 हजार 10 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 217 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. रहाटणी, पिंपळे गुरव, मोरवाडी, संत तुकारामनगर, थेरगाव, वाल्हेकरवाडी, मोशी, काळेवाडी, दापोडी, निगडी, दिघी, नेहरूनगर, बिजलीनगर, शिरूर, नारायणगाव, चाकण, येरवडा येथील 21 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 19 हजार 209 घरांना भेटी देऊन 60 हजार 790 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.










Leave a Reply