कोरोनावरील लसीची किंमत सिरम इन्स्टिट्यूटने केली जाहीर!
Pckhabar- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील लसीच्या प्रतीक्षेत सर्व देश असतानाच सिरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीची किंमत जाहीर केली आहे. लसीची किंमत 225 ते 250 रुपयांपर्यंत असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असून हि लस केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील सर्वसामान्यांना परवडणारी असावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे.
GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत 3 यूएस डॉलर्स म्हणजे साधारण 225 ते 250 रुपयांच्या घरात असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे.
“कोविड -19 विरुद्धचा लढा मजबूत आणि सर्वांगिण बनवण्याच्या प्रयत्नात एसआयआयने GAVI आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. भारतात 100 दशलक्ष डोसची निर्मिती करण्यात येईल. आणि वितरण 2021 मध्ये भारत आणि निम्न-मध्यम उत्पन्न असणार्या देशांसाठी असेल, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले.










Leave a Reply