रोगप्रतिकारक शक्ती एक परवलीचा शब्द – डॉ. अंकुश जाधव

रोगप्रतिकारक शक्ती एक परवलीचा शब्द – डॉ. अंकुश जाधव
Pckhabar-    रोगप्रतिकारक शक्तीचे सर्वात प्रथम महत्त्व माहित झाले ते 1986 साली भारतात आलेल्या एड्स या आजारामुळे. तेव्हाही नागरिक रोगप्रतिकारक शक्तीविषयी फार जागरूक झाले होते. पुढे विसरून गेले. आता पुन्हा रोगप्रतिकारक शक्तीची आठवण झाली ती कोरोनामुळे. कारण काय तर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. वास्तविक कोणताही आजार हा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानेच होतो, म्हणूनच रोगप्रतिकारक शक्तीचे महत्त्व कायमचेच आहे.
        वास्तविक, नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरात असतेच. मात्र, व्यक्तीनुसार कमी जास्त असते.म्हणूनच कोणतीही महागडी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधे घेण्याची विषेश आवश्यकता नसते. आपल्या नेहमीच्या आहारात शरीरास आवश्यक त्या सर्व पोषक घटकांचा समावेश असतो. आपल्या नेहमीच्या आहारातून नैसर्गिकरित्या मिळणार्‍या पोषणाला बाहेरून घेतलेली कोणतीही रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी उत्पादने ही पर्याय हाऊ शकत नाहीत.

   रोगप्रतिकारक शक्ती कशावर अवलंबून असते
      • रोगप्रतिकारक शक्ती अर्थात इम्युनिटी ही योग्य आहार, कोणत्याही स्वरूपाचा नियमित व्यायाम, मानसिक शांतता, पचन संस्थेतील सूक्ष्मजीव (मिक्रोफ्लोरा) व शांत झोप या सर्वांवर अवलंबून असते.
    • हिरव्या पाले व फळ भाज्या, दूध, लस्सी, तूप, शुद्ध (रिफाईंड नव्हे), दररोज गूळ शेंगदाणे खाणे इ. पदार्थांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
     रोगप्रतिकारक शक्ती कशाने कमी होते
 • मैदा व मैद्यापासुन बनविले जाणारे पदार्थ उदा. पाव, नान, बर्गर ई., सर्व प्रकारचे चायनीज, अति मसालेदार  व इन्स्टंट पदार्थ, जंक फूड, सर्व  प्रकारची शीत पेये, पॅक बंध पदार्थ.
 •अनियमित खाणे, रात्री अति जागरण करणे, सकाळी उशिरा उठणे (रात्र पाळीत काम करणारे सोडून), सतत ताण तणावात राहणे, अयोग्य आहार घेणे इ. कारणांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
  आपल्या नेहमीच्या आहार, विहारातच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोष्टी आहेत. त्याचा व्यवस्थित उपयोग करा व नेहमीच आपली रोगप्रतिकारक शक्ती ताजीतवाणी ठेवा आणि रोगांना पळवून लावा.
     थोडी त्रुटी वाटलीच तर डॉक्टरच्या सल्याने उपाय करा. स्वतःच्या मनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय करू नका, असे आवाहन डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे.
     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *