नेहरुनगर येथील कोविड सेंटरच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी
Pckhabar- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुकवारी) पाहणी केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 50 हजार होईल असा प्रशासनाचा कयास आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहे. तर, भोसरीतील बालनगरी येथे 425 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव , महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, अपक्ष आघाडीचे गटनेते बाबा बारणे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.










Leave a Reply