देहूगावात 138 रूग्ण कोरोनामुक्त; 36 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

देहूगावात 138 रूग्ण कोरोनामुक्त; 36 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगावात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. आत्तापर्यंत 177 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 138रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 36 जणांवर उपचार सुरू आहेत.

याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली.
देहूगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. गुरूवारी एकाच दिवशी कोरोनाच्या  8 नव्या रूग्णांची नोंद झाली. तर 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  त्यामुळे देहू परिसरात आत्तापर्यंत 177 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 138 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  36 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 21 रूग्णांना लक्षणे नसून 15 रुग्णांना लक्षणे आहेत. 13 रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत.

नागरिकांनी ताप, सर्दीसह अन्य कोणतीही लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा. सध्या पावसाळा सुरू असून नागरिकांनी मास्क ओला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. ओला मास्क न घालता एक अतिरिक्त मास्क जवळ ठेवावा, असे आवाहन  प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *