पवना धरणातील पाणीसाठ्यात 24 तासात 4.55 टक्के वाढ

पवना धरणातील पाणीसाठ्यात 24 तासात 4.55 टक्के वाढ
24 तासात 37 मिमी पाऊस

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाने गेल्या चार दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 11.44 टक्के वाढ झाली असून 24 तासात 4.55 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ३७ मि.मि.
१ जूनपासून झालेला पाऊस = ७५५ मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = २,७४८ मि. मि
धरणातील सध्याचा पाणीसाठा = ४६.७३ टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = ९४.१७ टक्के
गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= ४.५५ टक्के
१ जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = ११.४४ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *