पिंपरी चिंचवड शहरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

पिंपरी चिंचवड शहरात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

Pckhabar- पिंपरी-चिंचवड परिसरात अतिवृष्टी होण्याची  शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने महापालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय हवामान खात्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यासंदर्भात 3 ऑगस्ट रोजी निवेदन जाहीर केले. 

महापालिकेने यासंदर्भात तत्काळ आदेश काढून दि. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी नागरिकांनी गरजेनुसारच घराबाहेर पडावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, पाण्यातील विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक डिपीला स्पर्श करू नये, पादचारी भुयारी मार्ग (अंडरपास) तसेच पाणी साचलेल्या भागातून वाहनाने व पायी जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने  केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *