पुणे विभागीय आयुक्तांचा आळंदी नगरपरिषदेतर्फे सत्कार
Pckhabar- पुणे विभागीय आयुक्तपदी पुण्याचे माजी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती झाल्याबद्दल आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आळंदी नगरपरिषद आरोग्य समितीचे सभापती नगरसेवक सागर भोसले, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर उपस्थित होते.
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आळंदी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरीत विकास कामे, आळंदी भैरवनाथ चौक ते पद्मावती रस्त्याचे विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली.याशिवाय येथील एमआयटी महाविद्यालयात सुरु होत असलेल्या आळंदी कोविड केअर सेंटरला आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, आरोग्य सेवक आदी गरजेचे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विभागीय आयुक्त राव यांनी आळंदीतील प्रलंबित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्याची ग्वाही दिली.










Leave a Reply