…तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू; राष्ट्रवादीचे देहूगाव शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांचा इशारा

… तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू; राष्ट्रवादीचे देहूगाव शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांचा इशारा

Pckhabar- महावितरणच्या मनमानी आणि गलथान कारभाराला देहूतील नागरिक वैतागले आहेत. येत्या आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करून महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी अभियंत्यांना दिला आहे.
याबाबत हगवणे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ॲड. सुरेश खुर्पे, प्रदीप काळोखे, सोमनाथ चव्हाण, भरत काळोखे, शैलेश चव्हाण, खलील शेख, कुणाल काळोखे, सुनील कडुसकर, अमित घेणंद,प्रशांत बेंडभर, सचिन इंगवले, माजी उपसरपंच राणी मुसुडगे, जाई मोरे, शिंदे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.  ॲड. सुरेश खुर्पे, जाई मोरे, शिंदे गुरुजी आदींनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *