- गणेशमुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात
Pckhabar-कोरोनाच्या महामारीमुळे गणेशमूर्ती निर्मिती व्यवसाय धोक्यात आला असला तरी स्थानिक मूर्ती बनविणारे कलाकार अतिशय परिश्रम घेऊन सहकुटुंब मूर्ती बनवण्याचे काम करत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव येत्या 22 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. मात्र, यावर्र्षी कोरोनाच्या सावटाखाली हा उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच लहान मुर्त्यांची प्रतिष्ठापणा करण्याबाबत सरकारने सुचविले आहे. त्यामुळे गणेशमुर्ती तयार करणार्या कलाकारांवर मोठे संकट आले आहे. तळेगाव शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने मूर्ती काम करणारी अनेक कुटुंबे आहेत. या सर्व स्थानिक कलाकारांना कोरोना महामारीच्या संकटाने त्रस्त झाले आहेत.मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आलेले असून एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यातील लॉकडाऊन आणि बंदमुळे स्थानिक गणपती निर्मितीचे कारखाने बंद होते. घरातील प्रमुख मंडळी यांना बरोबर घेऊन मूर्तिकाम केले जात आहे. मूर्तीच्या कारखान्यात काम करणारे कलाकार लॉकडाऊनमुळे येऊन न शकल्याने आपल्या परिसरातील सहकार्यांबरोबर सहकार्यांना बरोबर घेऊन गणेश मूर्ती पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे स्थानिक मूर्तिकार विठ्ठल दरेकर यांनी सांगितले.
तळेगाव शहरात योगेश कार्लेकर, पांडुरंग कार्लेकर, संभाजी कुंभार, मारुती दरेकर, चंद्रकांत कुंभार आदी स्थानिक कलाकार आपापल्या घरात मूर्ती बनविण्याचे काम पारंपारिक पद्धतीने दरवर्षी करतात. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे अडचण निर्माण झालेली असून सध्या 90 टक्के पर्यंत मूर्तिकाम झाल्याचे स्थानिक कलाकारांनी सांगितले आहे.
गणेशमुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात










Leave a Reply