तळेगावात कोरोना प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन- आमदार सुनील शेळके यांनी दिली माहिती

तळेगावात कोरोना प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन
 Pckhabar- तळेगाव दाभाडे येथे कोरोना प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली दिली.
आमदार सुनिल शेळके व कृष्णा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी आज मंगळवार दि. 4  ते शनिवार दि. 8 पर्यंत मोफत कोरोना प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये दि 4, 5, 6 रोजी तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेमध्ये कोरोना प्राथमिक तपासणीचे आयोजन केले आहे.

तर दि. 7 व 8 रोजी तळेगाव स्टेशन येथील संत ज्ञानेश्वर शाळेत  कोरोना प्राथमिक तपासणीचे आयोजन केले आहे. ही तपासणी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *