Dehu news: रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांकडून कोविड सेंटरला मदत
Pckhabar-देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालय व कै. शंकरराव मोरे ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्ववर्गणीतून देहूगाव कोविड केअर सेंटरला १७ हजार ५०० रुपये किंमतीचे अॅन्टिजेन टेस्ट किटची मदत केली.
अॅन्टिजेन टेस्ट किट कोविड सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील शिक्षकांनी स्वः वर्गणी जमा करून अँटिजन टेस्ट किट भेट दिली. विद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद यादव, उपमुख्यध्यापिका सुनंदा वडाळकर, पर्यवेक्षक पोपट मोरे, शिक्षक सेवक वर्ग यावेळी उपस्थित होते.
देहूगाव परिसरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अॅन्टिजेन तपासण्याही वाढविण्यात आल्या आहेत. याबाबत डॉ. किशोर यादव यांनी मदतीचे आवाहन केले होते.










Leave a Reply