Lonavala news: आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर सीबीआयचा छापा
Pckhabar- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधील बंगल्यावर आज मंगळवारी सीबीआयचा पथकाने छापा टाकला . अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आल्याने याची साधी भनक देखील स्थानिक पोलीस प्रशासनाला लागली नाही .
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मागील काळात ईडीने प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलाची चौकशी केली होती . मात्र नंतर ही कारवाई थंडावली होता . आत पुन्हा सीबीआयने अचानक हा छापा टाकल्याने त्यामधून काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . सरनाईक यांचा लोणावळ्याजवळील कुणेगाव ग्रामपंचायत हद्दीमधील एक रिसॉर्टमध्ये हा बंगला आहे .
त्याठिकाणी हा छापा टाकण्यात आला असून सरनाईक या बंगल्यात कधी आले होते तसेच अन्य काही पुरावे मिळतात का याचा तपास या पथकाकडून सुरू आहे . याकरिता रिसॉर्टचे सिसीटिव्हि फुटेज देखील तपासले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे .










Leave a Reply