Pimpri Corona news:  दोन महिन्यानंतर रुग्ण संख्या पुन्हा घटली

Pimpri Corona news:  दोन महिन्यानंतर रुग्ण संख्या पुन्हा घटली

605 नवे रूग्ण
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. तसेच मंगळवारी मृत्यूची संख्याही कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत सोमवारी 605 नवे रूग्ण आढळले आहेत. 57 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 93 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 43 हजार 185 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 24 हजार 419 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 शहरात महापालिका हद्दीत 40 तर हद्दीबाहेरील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 हजार 12 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार356 घरांना भेटी देऊन 8 हजार 436 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 230 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 826 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 65 हजार 73 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *