Dehu News : वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला औषधांची मदत

Dehu News : वाढदिवसाचा खर्च टाळून कोविड सेंटरला औषधांची मदत

Pckhabar- चिंचोली येथील रहिवासी शितल जाधव यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जोपासत देहूगाव येथील कोविड सेंटरला 18 हजार रुपयांची औषधांची मदत केली.

देहूगाव कोविड सेंटरचे प्रमुख डॉ किशोर यादव यांच्याकडे ही औषधे सुपूर्द करण्यात आली.

देहूगाव येथील कोविड सेंटरमध्ये माळवाडी, विठ्ठलवाडीसह आदी परिसरातील कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहे. या कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत एक हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. औषधे दिल्याबद्दल डॉ. किशोर यादव यांनी शितल जाधव यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *