Pimpri Corona news: दिलासादायक, सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रूग्ण संख्या हजाराच्या आत

Pimpri Corona news: दिलासादायक, सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रूग्ण संख्या हजाराच्या आत
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. तसेच रविवारी मृत्यूची संख्याही कमी झाल्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत रविवारी 914 नवे रूग्ण आढळले आहेत. 59  जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 468 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 41 हजार 734 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 20 हजार 259 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 44 तर हद्दीबाहेरील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 639 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 18 घरांना भेटी देऊन 7 हजार 351 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 311 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 40 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 63 हजार 494 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *