Corona Good News : रूग्ण संख्या हजाराच्या आत!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. मात्र, मृत्यू संख्या कमी होत नाही. महापालिका हद्दीत शनिवारी 959 नवे रूग्ण आढळले आहेत. 79 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 105 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 40 हजार 820 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 17 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी शहरात महापालिका हद्दीत 44 तर हद्दीबाहेरील 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 93 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 430 घरांना भेटी देऊन 8 हजार 670 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 306 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 80 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 62 हजार 35 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply