Pimpri Corona news: दिलासादायक! 1 हजार 109 नवे रूग्ण, 1 हजार 758 जणांना सोडले घरी
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रूग्णांची संख्येसह रूग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत 1 हजार 109 नवे रूग्ण आढळले आहेत. 77 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 758 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 39 हजार 861 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 15 हजार 686 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी शहरात महापालिका हद्दीत 46 तर हद्दीबाहेरील 31 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 368 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 437 घरांना भेटी देऊन 8 हजार 596 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
शहरात मेजर कन्टेंन्मेंट 360 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 171 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 59 हजार 35 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply