Pimpri Corona news: रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रूग्णांची संख्येसह रूग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत 1 हजार 327 नवे रूग्ण आढळले आहेत. 73 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 57 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 38 हजार 752 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 13 हजार 928 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरूवारी शहरात महापालिका हद्दीत 47 तर हद्दीबाहेरील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 875 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 70 घरांना भेटी देऊन 7 हजार 416 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 352 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 152 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 53 हजार 469 जणांचे लसीकरण करण्यात आले.










Leave a Reply