Pimpri Corona news: 1 हजार 547 नवे रूग्ण, 1 हजार 999 जणांना सोडले घरी

Pimpri Corona news: 1 हजार 547 नवे रूग्ण, 1 हजार 999 जणांना सोडले घरी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्येसह रूग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत 1 हजार 547  नवे रूग्ण आढळले आहेत. 69 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 999 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 32 हजार 904 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 8 हजार 987  जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 423 तर हद्दीबाहेरील 1 हजार 751 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 8 हजार 510 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 429 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.

3 हजार 102 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 2 हजार 202 घरांना भेटी देऊन 7 हजार 435 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 350 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 15 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 44 हजार 381 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.