Pimpri Corona news: सलग दुसर्या दिवशी रूग्ण संख्या घटली !
1 हजार 169 नवे रूग्ण, 1 हजार 965 जणांना सोडले घरी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रूग्णांची संख्येसह रूग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत 1 हजार 134 तर हद्दीबाहेरील 35 असे 1 हजार 169 नवे रूग्ण आढळले आहेत. 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 965 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 31 हजार 357 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 6 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 378 तर हद्दीबाहेरील 1 हजार 727 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 186 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 10 हजार 45 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला.
2 हजार 568 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 995 घरांना भेटी देऊन 6 हजार 916 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 347 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 18 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 36 हजार 632 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.










Leave a Reply