Pimpri Corona news: रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक
2 हजार 54 नवे रूग्ण, 2 हजार 471 जणांना सोडले घरी
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्या रूग्णांची संख्येसह रूग्ण संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. महापालिका हद्दीत 2 हजार 20 तर हद्दीबाहेरील 34 असे 2 हजार 54 नवे रूग्ण आढळले आहेत. 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 471 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 30 हजार 223 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 5 हजार 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 339 तर हद्दीबाहेरील 1 हजार 702 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 10 हजार 486 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 8 हजार 163 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 4 हजार 561 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 715 घरांना भेटी देऊन 5 हजार 954 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 325 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 186 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 36 हजार 632 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, मृत झालेल्या केसेस रविवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Pimpri Corona news: रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या अधिक










Leave a Reply