Pimpri Corona news: 2 हजार 131 नवे रूग्ण, 64 जणांचा मृत्यू

Pimpri Corona news: 2 हजार 131 नवे रूग्ण, 64 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या  रूग्णांची संख्या कमी काही प्रमाणात कमी झाली आहे. महापालिका हद्दीत 2 हजार 131  नवे रूग्ण आढळले आहेत. 64 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 919 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 28 हजार 203 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 2 हजार 552  जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 298 तर हद्दीबाहेरील 1 हजार 678 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 601 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 7 हजार 105 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 4 हजार 258 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 622 घरांना भेटी देऊन 4 हजार 941  व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 301 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 164 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 36 हजार 632 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, मृत झालेल्या केसेस शनिवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *