Pimpri Corona news: 2 हजार 518 नवे रूग्ण, 67 जणांचा मृत्यू

Pimpri Corona news: 2 हजार 518 नवे रूग्ण, 67 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्या कमी काही प्रमाणात कमी झाली आहे. महापालिका हद्दीत 2  हजार 518  नवे रूग्ण आढळले आहेत. 67 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 315 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 23 हजार 966 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 98 हजार 690 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 215 तर हद्दीबाहेरील 1 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 9 हजार 963 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 6 हजार 679 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 3 हजार 728 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 284 घरांना भेटी देऊन 4 हजार 5  व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 294 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 223  करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 30 हजार 99  जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान,  मृत झालेल्या केसेस गुरूवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *