कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून पाथरूड पाच दिवस बंद
Pc kabahar: शहरानंतर कोरोना विषाणूने आता ग्रामीण भागातील पाथरुडमध्ये शिरकाव केला आहे. भूम तालुक्यातील पाथरूडमध्ये कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या सोमवारपासून पाथरूडगावात कडक लॉकडाऊन असणार आहे. दि. 3 ते 7 ऑगस्ट 2020 असे पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद असणार आहेत. याबाबतचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी बंदला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच बापू तिकटे, उपसरपंच धनंजय बोराडे यांनी केले आहे.
मुंबई, पुणे, नाशिक या मोठ्या शहरासह राज्याच्या विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मागील पाच महिन्यांपासून ग्रामीण भाग कोरोनामुक्त होता. पण, आता कोरोनाने खेड्या पाड्यात शिरकाव केला आहे. कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतील. त्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पाथरूड पंचक्रोशीत आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाथरूडमध्ये उद्यापासून लॉकडाऊन असणार आहे. दि. 3 ते 7 ऑगस्ट 2020 असे पाच दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दूध संकलन, दवाखाने, मेडिकल दुकाने सुरू राहतील. बाकी आस्थापना पूर्णपणे बंद असणार आहेत.
सर्व नागरिकांनी बंद पाळून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क करून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच बापू तिकटे, ग्रामविकास अधिकारी एस.बी.केंद्रे यांनी केले आहे.










Leave a Reply