Pimpri Corona news: 2 हजार 148 नवे रूग्ण, 65 जणांचा मृत्यू, 2 हजार 183 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: 2 हजार 148 नवे रूग्ण, 65 जणांचा मृत्यू, 2 हजार 183 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रूग्णांची संख्या कमी बुधवारी काही प्रमाणात कमी झाली आहे.  महापालिका हद्दीत 2  हजार 148  नवे रूग्ण आढळले आहेत. 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 183 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 21 हजार 448 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 97 हजार 372 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 173 तर हद्दीबाहेरील 1 हजार 604 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 11 हजार 759 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 8 हजार 943 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 962 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 306 घरांना भेटी देऊन 4 हजार 316 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 276 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 214  करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 18 हजार 845  जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान,  मृत झालेल्या केसेस बुधवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *