Talegaon news: मुख्याधिकारीपदी श्याम पोशेट्टी

ही बातमी शेअर करा.

Talegaon news: मुख्याधिकारीपदी श्याम पोशेट्टी

Pckhabar-तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी श्याम पोशेट्टी यांची राज्यशासनाने नियुक्ती केली आहे. गेली दोन महिने मुख्याधिकारीपद रिक्त असल्याने तळेगाव नगरपरिषदेची  विकास कामे ठप्प झाली होती. मुख्याधिकांऱ्यांची नियुक्ती झाल्याने  विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची 29 फेब्रुवारी रोजी पदोन्नतीने बदली झाली होती.  तेव्हापासून हे पद रिक्त होते, प्रभारी मुख्याधिकारी म्हणून चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे हे काम पाहत होते. त्यांची चाकण आणि तळेगाव नगरपरिषदेचे कामकाज पाहताना कसरत होत होती.

तळेगाव शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  मुख्याधिकारीच नसल्याने प्रशासनावर कोणाचाच वचक नसल्याने दिसून येत होते.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी मुख्याधिकारी म्हणून श्याम पोशेट्टी यांची नियुक्ती केली आहे.


ही बातमी शेअर करा.