Dighi news: मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनामुळे निधन

ही बातमी शेअर करा.

Dighi news: मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनामुळे निधन
Pckhabar- दिघी येथील मुक्त पत्रकार गणेश पोपट थोपटे यांचे कोरोनामुळे आज (सोमवारी) निधन झाले आहे. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

गणेश थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुक्त पत्रकारिता करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय विषयांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले होते. सामाजिक कार्यासह नेहमी मदतीसाठी धावणारे थोपटे यांची अशी ओळख होती.

 


ही बातमी शेअर करा.