Dehu News : आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते कोविड योध्दांचा सत्कार

Dehu News : आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते कोविड योध्दांचा सत्कार
आमदार शेळके यांनी कोविड सेंटरची केली पाहणी
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहू येथील कोविड सेंटरची मावळ विधानसभेचे आमदार  सुनिल शेळके यांनी रविवारी पाहणी केली. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांशी संवाद साधला. तसेच सेंटरमधील सर्व कोविड योध्दांचा आमदारांनी सत्कार केला.

देहूगावात 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये देहूसह, विठ्ठलवाडी, माळवाडी आदी परिसरातील रूग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमधून अनेक रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. तर अजूनही अनेक रूग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

कोरोना बाधित रुग्णांसाठी कोविड सेंटरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ञ आणि कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव आणि त्यांची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. डॉ. यादव यांच्यासह आरोग्य सेविका, सेवा कर्मचारी यांचा आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या कामाचे आमदार शेळके यांनी कौतूक केले.