Pimpri Corona news: कोरोना रुग्ण संख्येची पुन्हा उसळी!
92 जणांचा मृत्यू, 2933 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोना रूग्ण संख्येने तीन हजारांचा टप्पा गाठला आहे. मृत्यूची संख्याही कमी होत नाही. रविवारी शहरात 2 हजार 933 नवे रूग्ण आढळले असून 92 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 485 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरात आत्तापर्यंत 2 लाख 15 हजार 393 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 90 हजार 421 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 3 हजार 33 तर हद्दीबाहेरील 1 हजार 521 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 10 हजार 749 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 7 हजार 294 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 492 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 342 घरांना भेटी देऊन 4 हजार 342 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 292 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 95 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 18 हजार 845 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, मृत झालेल्या केसेस रविवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.










Leave a Reply