Pimpri news: ऑटो क्लस्टरच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा, नगरसेवकांची संतप्त मागणी
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ऑटो क्लस्टरमध्ये एक लाख रूपये घेऊन रुग्णाला आयसीयू बेड दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापन करणाऱ्या स्पर्शच्या डाॅक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटरचे करार रद्द करावा, अशी संतप्त मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एप्रिल महिन्याची सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे आहेत.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू आहे. स्पर्श संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. चिखली येथील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला कोरोनाची लागण झाली होती. त्या वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आयसीयू बेडची आवश्यकता लागेल असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. ‘आम्ही तुम्हाला आयसीयू बेड मिळवून देतो, हॉस्पिटलचे नाव सांगत नाहीत. फक्त एक लाख रुपये भरावे लागतील’ असे सांगितले. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिले. एक लाख रुपये मिळाल्यानंतर स्पर्श संचलन करत असलेल्या महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमधील मोफत असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मुख्याध्यापिकेचे बुधवारी (दि.28) दुर्देवाने निधन झाले. या प्रकरणाची सभागृहात सत्ताधारी भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी वाचा फोडली. तसेच या प्रकरणाची ऑडिओ क्लिप ऐकवली.
भाजप नगरसेवक विकास डोळस म्हणाले महापालिकेच्या ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटर म्हणजे डेंड हाऊस झाले आहेत. येथे पाठविलेले अनेक रुग्णाची डेडबाॅडी बाहेर येत आहे. महामारीत पैसे उकळणाऱ्या स्पर्श डॉक्टरांना ठोकणार असा इशारा डोळस यांनी दिला. नगरसेविका मिनल यादव म्हणाल्या, ऑटो क्लस्टर आणि जम्बो कोविड सेंटर कोणाच्या बापाचे नाही.
या विषयावर सुजाता पालांडे, आशा शेंडगे, निता पाडाळे, नगरसेवक सचिन भोसले, अंबादास कांबळे आदी नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली.










Leave a Reply