Pimpri News : व्हेंटिलेटर्स खरेदीची घाई, वापर अद्याप नाही !

Pimpri News : व्हेंटिलेटर्स खरेदीची घाई, वापर अद्याप नाही !
मनपा प्रशासनाची जीवघेणी दिरंगाई,
युवक काँग्रेस ची आयुक्तांकडे तक्रार !

Pckhabar-कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या दूस-या लाटेत आजवर मोठी जीवितहानी झाली आहे व अद्यापही चिंताजनक संख्येत रूग्णांचे मृत्यू होत आहेत व ही बाब नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक आहे.

पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून सुरूवातीपासूनच या अत्यंत महत्वाच्या व थेट नागरिकांच्या जीवनांशी निगडीत असलेल्या या आजाराच्या उपाययोजनां बाबत हेळसांड, अनियमितता, दूर्लक्ष व दिरंगाई होत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी दि. ०८ आणि ०९ एप्रिल २०२१ रोजी ५० नग आयसीयू व्हेंटिलेटर अण्णासाहेब मगर क्रिडा संकुलातील जम्बो रूग्णालयातील उपचारासाठी प्रत्येक नग रू.८ लाख प्रमाणे एकूण ५० नगांसाठी चार कोटी रूपयांची थेट पध्दतीने करण्यात आली. हि खरेदी होऊन २० दिवस झाले व सदर व्हेटिंलटर्स अद्यापही रूग्ण सेवेत जम्बो रूग्णायलात कार्यान्वित झालेले नाहीत.

या बाबत प्रत्यक्ष जम्बो रूग्णालय चालक संस्थेकडे जाऊन माहीती घेतली असता सदर व्हेंटिलटर्स व संबंधित पाईप लाईन फिटिंगचे काम हे मनपा चे असल्याचे सांगण्यात आले व जवळपास मागील १५ दिवसांपासून हे काम प्रलंबित असल्याचे समजले व या अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कामाच्या दिरंगाई बाबत कळाले.

“नागरिकांवर अत्यंत कठिण वेळ आली आहे सगळी कडे आय सी यू व व्हेंटिलेटर शोधण्यात नागरिकांची दयनीय अवस्था झाली आहे व शहराची पालकसंस्था असलेली महानगरपालिका या व्हेंटिलेटर यंत्रणेबाबतीत अशी दिरंगाई करते हे या अशा वेळेत सहनच होऊ शकत नाही या सर्व प्रकांरामुळे नागरिकांच्या भावनांचा संयम संपून जनप्रक्षोभ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी त्वरित ही व्हेंटिलेटर यंत्रणा सुरू करावी व या प्रकरणात दोषी असणा-यावर कारवाई करावी”
अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *