Pimpri Corona news: 93 जणांचा मृत्यू, 2516 नवे रूग्ण, 2247 जणांना डिस्चार्ज

Pimpri Corona news: 93 जणांचा मृत्यू, 2516 नवे रूग्ण, 2247 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. गुरूवारी महापालिका 2 हजार 516  नवे रूग्ण आढळले आहेत. तर 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 8 हजार 417 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 83 हजार 86 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 880 तर हद्दीबाहेरील 1 हजार 381 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 11 हजार 154 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 8 हजार 81 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 2 हजार 848 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 151  घरांना भेटी देऊन 3 हजार 733 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 305 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 127 करण्यात आले आहेत. शहरात 3 लाख 5 हजार 376  जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 55 पुरूष तर 38  महिला अशा 93  जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या केसेस गुरूवारी कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे. मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *