Akurdi News: आकुर्डीतील रूग्णालयाचे काम अंतिम टप्यात

Akurdi News: आकुर्डीतील रूग्णालयाचे काम अंतिम टप्यात
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या आकुर्डी येथील रुग्णालयाची पाहणी आयुक्त राजेश पाटील यांनी केली. येथील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, थॉमस नरोना, संजय खाबडे, अनिल शिंदे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता साळवे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे आदी उपस्थित होते.

आकुर्डी गावठाण येथील जागेत 100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 39 कोटी रुपये खर्च करून अद्यावत 5 मजली रुग्णालयाची इमारत उभारली जात आहे. याठिकाणी बसविण्यात येणार्‍या विविध उपकरणे तसेच इतर साहित्य आणि सुविधांची पाहणी आयुक्त राजेश पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *