Pimpri news: 1 मे पासून 18  वर्षावरील लसीकरण होणार नाही, लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका; आयुक्तांचे आवाहन

Pimpri news: 1 मे पासून 18  वर्षावरील लसीकरण होणार नाही, लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नका; आयुक्तांचे आवाहन
Pckhabar-अठरा वर्षावरील सर्वांचे लसीकरण 1 मे पासून केले जाणार होते. मात्र, लशींचा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी चिंचवड शहरात अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर गेले आहे. त्यामुळे 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापि, सध्यस्थितीत लशींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जोपर्यंत लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तोपर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही.

याबाबत नागरिकांना वेळोवेळी सुचित केले जाईल. त्यामुळे 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *