Chinchwad news: शनिवारी नवी सांगवीत रक्तदान शिबिर

Chinchwad news: शनिवारी नवी सांगवीत रक्तदान शिबिर
Pckhabar- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज ओळखून सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ 1 मे रोजी नवी सांगवीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर नवी सांगवी, कृष्णा बाजार चौकातील निळू फुले नाट्यगृह येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणार आहे.  रक्तदान शिबिरादरम्यान सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9823138867, 9270773727 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 सांगवी परिसर महेश मंडळाचे अध्यक्ष सतिश लोहिया म्हणाले ” देशभरात येत्या काही दिवसानंतर 18 वर्षांच्या पुढील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लसीकरण झाल्यानंतर पुढचे 60 दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रक्ताचा हा तुटवडा टाळण्यासाठी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे”. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 तसेच रक्तदाता, मित्र किंवा नातेवाईकांसाठी गरज पडल्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही लोहिया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *