Chinchwad news: लायन्स क्लबतर्फे दोन हॉस्पिटलला तीन मिनी व्हेन्टींलेटर
Pckhabar- लायन्स क्लब ऑफ पुणे तळेगांव यांच्या वतीने, तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी यांच्या विशेष सहकार्याने क्लबचे माजी प्रांन्त पाल व कमला शिक्षण संकूलचे संस्थापक सचिव डॉ दिपक शहा यांनी मानवतेच्या भूमिकेतून पिंपरी येथील सीटी केअर हॉस्पीटल तसेच वेदान्त हॉस्पीटलला ( शाहूनगर) तीन मिनी व्हेन्टींलेटर रुग्णसेवेसाठी दिली.
डॉ . दिपक शहा यांच्या वतीने क्लबचे प्रांन्त पाल अभय शास्त्री याच्या हस्ते डॉ अरविंद पाटील , डॉ. निलेश पाटील याच्या कडे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले यावेळी तळेगांव लायन्स क्लबच्या अध्यक्षा प्रमिला वाळूंज , लिओच्या अध्यक्षा क्रांन्ती वाळूंज , भोसरी क्लबचे अध्यक्ष संजय बिराजदार , माजी अध्यक्ष अनिल झोपे, जिल्हाचे सचिव परमानंद शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते .










Leave a Reply